प.पू. श्री. केणेकाका, हे विज्ञानाचे पदवीधर. मूळचे चौल, अलिबागचे. मोठ्या हिमतीने त्यांनी रासायनिक उद्योग यशवीपणे काही काळ चालविला. पण त्याच बरोबर केवळ संसारात मन न गुंतविता त्यांनी तीव्र दत्तभक्तीचीही कास धरली. यामुळे अनामिक प्रेरणा आणि दिव्य संकेत मिळून त्यांच्या जीवनाला विलक्षण कलाटणी मिळत गेली. अशाच प्रेरणेने त्यांनी दर पौर्णिमेस एक ह्याप्रमाणे १०८ गिरनार वाऱ्यांचा संकल्प सोडला. त्यानंतरही श्री दत्तकृपेने दर पौर्णिमेची त्यांची गिरनारयात्रा आजही अखंडपणे चालू आहे. आजपर्यंत त्यांच्या पौर्णिमा आणि पौर्णिमेव्यतिरिक्त मिळून 290 च्यावर वाऱ्या संपन्न झाल्या आहेत. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता केलेल्या या यज्ञाद्वारे त्यांनी श्री दत्तप्रभूंचे आशीर्वाद आणि कृपादृष्टी प्राप्त केली.
गुजरात जुनागढ जवळ असलेला गिरनार पर्वत हा श्री. दत्तमहाराजांच्या जागृत स्थानांपैकी एक. महाराजांच्या बारा हजार वर्षांच्या तपश्चर्येने पावन झालेली तपोभूमी. दहा हजार पायऱ्या (तीन हजार पाचशे फूट उंची) चढून गेल्यावर स्वयंभू पादुकांचे दर्शन होते. श्रद्धेची कसोटी पाहणाऱ्या गिरनार यात्रेचे महत्व प्राचीन काळापासून आहे
काकांना गिरनार यात्रा करीत असताना अनेक अद्भुत विलक्षण अनुभव येत गेले. त्यांनी लिहिलेल्या "दिव्यत्वाची जेथे प्रचिती" या 3 भागात प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्यांनी आपल्या गिरनार वारीतील अनुभव व त्यावर केलेले मार्गदर्शनपर भाष्य वाचून साधकांना निश्चित प्रेरणा मिळते आहे व मिळत राहील.
"महाराजांनी एक ज्योत प्रज्वलित केली आणि दत्तभक्तीचा मार्ग दाखविण्याची आज्ञा केली. पाहता पाहता या ज्योतीची मशाल झाली. एक मशाल दुसऱ्या मशालीला भिडली. दुसरी तिसरीला आणि मग एकापाठोपाठ एक दत्तभक्तीची ज्योत अंतरी प्रज्वलित होऊन अशा कित्येक ज्योती गिरनारकडे दत्तनामाच्या गजरात झेपावू लागल्या. गुरुभक्तीच्या इवल्याशा ज्योतीने किमया केली. दत्तभक्तीचा वणवा गिरनारवर पेटू लागला.”
श्री दत्तप्रभुंच्या कृपेने श्री. केणे काकानां अलिबाग जवळ, चौल येथे, त्यांच्या जन्मगावी, अतिरुद्र स्वाहाकार यज्ञ आणि शिवदत्त मंदिराचे निर्माण करण्याचा श्री दत्तप्रभूंचा आदेश आला. त्यानुसार डिसेंबर २०१३ मध्ये तेरा दिवसांचा अतिरुद्र स्वाहाकार आणि तदनंतर मार्च २०१६ मध्ये शिवदत्त मंदिराची निर्मीती पूर्ण होऊन प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली.
शिवदत्त मंदिराचे निर्माणकार्य श्री दत्तप्रभूंच्या संकेतानुसार संपन्न झाले आहे. केवळ जांभा चिऱ्यांची, शिवपिंडीच्या आकारात साकारण्यात आलेली मंदिराची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या वरच्या गाभाऱ्यात श्री अवधूतेश्वर गिरनारी दत्ताची शिवस्वरूपात असलेली काळ्या पाषाणातील मंद स्मितहास्य, ध्यानस्त, सोज्वळ मूर्ती चित्तवेधक आहे. प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंच्या अस्तित्त्वाची ग्वाही देणारी आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात तर साक्षात शिवशक्तिचे, श्री दत्त उमामहेश्वरांचे स्थान आहे आणि त्यालाच वेढून आहे अवतारी विभूतींच्या सान्नीध्यातले ध्यान- कक्ष. मंदिराला लाभलेला शांत, नयमरम्य परिसर आणि जोडीला अविरत उमटणारी अलौकिक दैवी स्पन्दने ; ध्यान- कक्षात श्रद्धापूर्वक ध्यान्यास बसलेल्या साधकास शरणागत भावानुसार अनुभूती न येईल तर ते नवलच ठरावे.
आतापर्यंत ह्या मंदिराच्या पुण्यभूमीत मार्च २०१६ पासून दर महा एक ह्या प्रमाणे वैविध्यपूर्ण याग श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार विश्वकल्याण हेतू संपन्न झाले आहेत व होणार आहेत. पुनश्च 2019 मधे अतिरुद्र स्वाहाकार यज्ञIचाही ह्यात समावेश आहे.
मंदिराशी निगडित यज्ञयाग, आजुबाजुच्या गावांसाठी मोफत आरोग्य शिबिरे आणि इतर सामाजिक कार्यासाठीचे निधी संकलन हे केवळ आणि केवळ जनसामानांच्या भिक्षेद्वारेच व्हावे असा दत्तप्रभूंचा आदेश शिरोधार्य मानून श्री. केणेकाका श्री. दत्तप्रभूंची झोळी फिरवतात आणि "शिवदत्त मंदिर – सेवा कार्यास हातभार लावतात.
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged.
It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.
Temples managed
Childrens help to education
Followers