Shiv Datta Mandir

Shiv Datta Mandir

श्री दत्तप्रभुंच्या कृपेने परमपुज्य श्री. प्रमोद केणे काकांना अलिबाग तालुक्यातील, चौल येथे त्यांच्या जन्मगावी अतिरुद्र स्वाहाकार महायज्ञ आणि शिवदत्त मंदिर निर्माण करण्याचा श्री. दत्तप्रभुंचा आदेश आला. त्यानूसार डिसेंबर २०१३ साली, दि. 19/12/2013 ते 01/01/2014 या कालावधीत अभूतपूर्व असा अतिरुद्र स्वाहाकार यज्ञ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला करवीर पीठाचे सद्गुरु श्री. शंकराचार्य उपस्थित होते. सलग 13 दिवस चाललेल्या या दिव्य सोहळ्यात उपस्थित सद्भक्तांना विविध पातळीवरील दिव्य अनुभूती आल्या. पूर्णाहुतीच्या शेवटच्या दिवशी महाआरती च्या वेळी परमपुज्य केणे काकां ना भगवान श्री दत्त प्रभूंचा त्याच रुद्रभूमीवर शिवदत्त मंदिराची निर्मिती व पुन्हा एकदा अतिरुद्र स्वाहाकार संपन्न करण्याचा आदेश झाला.

Datta Dhuni Ashram

श्री. दत्तप्रभूच्या संकेतानुसार मंदिर परिसरातच दि. २६ मे २०२२ रोजी अखंड दत्तधुनी आश्रमाची स्थापना झाली व तदनंतर तेथील धुनी अखंड प्रज्वलित आहे. दि. १९ जानेवारी २०२३ रोजी दत्तधुनी आश्रमात सफेद संगमरवरी पाषाणात घडविलेल्या अत्यंत सुबक आणि प्रसन्न विष्णुस्वरूपातील श्री. दत्तमहाराजांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली.