Spiritual Journey

शिवदत्त मंदिराचे निर्माण

श्री दत्तप्रभुंच्या कृपेने परमपुज्य श्री. प्रमोद केणे काकांना अलिबाग तालुक्यातील, चौल येथे त्यांच्या जन्मगावी अतिरुद्र स्वाहाकार महायज्ञ आणि शिवदत्त मंदिर निर्माण करण्याचा श्री. दत्तप्रभुंचा आदेश आला. त्यानूसार डिसेंबर २०१३ साली, दि. १९/१२/२०१३ ते ०१/०१/२०१४ या कालावधीत अभूतपूर्व असा अतिरुद्र स्वाहाकार यज्ञ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला करवीर पीठाचे सद्गुरु श्री. शंकराचार्य उपस्थित होते. सलग १३ दिवस चाललेल्या या दिव्य सोहळ्यात उपस्थित सद्भक्तांना विविध पातळीवरील दिव्य अनुभूती आल्या. पूर्णाहुतीच्या शेवटच्या दिवशी महाआरती च्या वेळी परमपुज्य केणे काकां ना भगवान श्री दत्त प्रभूंचा त्याच रुद्रभूमीवर शिवदत्त मंदिराची निर्मिती व पुन्हा एकदा अतिरुद्र स्वाहाकार संपन्न करण्याचा आदेश झाला.

तद्नंतर मार्च २०१६ साली श्री दत्त प्रभूंच्या कृपाशीर्वादाने व आदेशानूसार भव्य शिवदत्त मंदिराची निर्मिती पूर्ण होऊन महाशिवरात्रीच्या पवित्र शुभमुहूर्तावर मंदिरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आणि सलग १३ दिवसांचा अतिरुद्र स्वाहाकार महायज्ञ

डिसेंबर २०१९ साली पुनश्चः १३ दिवसांचा अतिरुद्र स्वाहाकार महायज्ञ संपन्न होऊन प्रथम संपुट पूर्ण झाले.

शिवदत्त मंदिराचे निर्माण श्री. दशप्रभूंच्या संकेतानुसार संपन्न झाले आहे. केवळ जांभा चिऱ्यांची शिवपिंडीच्या आकारातील बांधणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या बाहेर बसलेल्या नंदीच्या भव्य मूर्तीने मंदिराच्या दर्शनाला सुरूवात होते.

श्री. दत्त उमामहेश्वरांचे मंदिर

मंदिराच्या खालील मूळ गाभाऱ्यात साक्षात शिवशक्तीचे व श्री. दत्त उमामहेश्वरांचे स्थान आहे. त्याला वेढून अवतारी विभूतींच्या सानिध्यात गोलाकार आकारातील ध्यान कक्ष आहे.

श्री. अवधूतेश्वर गिरनारी मंदिर

मंदिराच्या वरच्या भागातील गाभाऱ्यात श्री. अवधूतेश्वर गिरनारी दत्ताची शिवस्वरूपात असलेली काळ्या पाषाणातील मंद स्मितहास्य, ध्यानस्थ, सोज्वळ व साक्षात श्री. दत्तप्रभूंच्या अस्तित्वाची ग्वाही देणारी चित्तवेधक मूर्ती आहे.

मंदिराला लाभलेला शांत, नयनरम्य परिसर आणि जोडीला अविरत उमटणारी अलौकिक दैवी स्पंदने ध्यान कक्षात श्रद्धापूर्वक शरणांगत भावानूसार ध्यानास बसलेल्या साधकांस प्रसन्न अनुभूती देतात.

अखंड दत्तधुनी आश्रमाची स्थापना:

श्री. दत्तप्रभूच्या संकेतानुसार मंदिर परिसरातच दि. २६ मे २०२२ रोजी अखंड दत्तधुनी आश्रमाची स्थापना झाली व तदनंतर तेथील धुनी अखंड प्रज्वलित आहे. दि. १९ जानेवारी २०२३ रोजी दत्तधुनी आश्रमात सफेद संगमरवरी पाषाणात घडविलेल्या अत्यंत सुबक आणि प्रसन्न विष्णुस्वरूपातील श्री. दत्तमहाराजांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली.

दर महा विविध यज्ञ

सन २०१६ पासूनया पवित्र मंदिराच्या पुण्यभूमीत दरमहा एक याप्रमाणे सातत्याने वैविध्यपूर्ण याग विश्वकल्याण हेतूने संपन्न झाले आहेत व होत आहेत आतापर्यंत संपष्ट झालेल्या वैविध्यपूर्ण यागांमध्ये

  • १०८ सत्यदत्त पूजा
  • महादत्त याग
  • २ वेळा १३ दिवसांचा अतिरुद्र महाअनुष्ठान
  • ५१ शक्तिपीठ-अखंड भारतमाता याग
  • १२ ज्योतीलिंग याग
  • क्रांतिसूर्य महायाग
  • स्वातंत्रसूर्य महायाग (देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांसाठी समर्पित याग
  • राष्ट्र विघ्ननिवारक श्री. गणेशयाग
  • मातृशक्ति याग
  • कलावर्धन याग
  • महाशिवरात्री लघुरूद्र
  • सप्तचिरजीव याग
  • एकादशरुद्र याग
  • अष्टवसु याग
  • नवनाथ याग, द्वादशादित याग
  • अष्टविनायक याग
  • महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठयाग
  • शिवदशावतार याग
  • श्री. दत्तात्रेयांचा २४ गुरूंचा याग व याव्यतिरिक विविध यागांचा समावेश आहे

Our Vision And Mission

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged.

What We Do

It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

account_balance

10+

Temples managed

book

1000+

Childrens help to education

person

10000+

Followers